पहिल्या टप्प्यात 100पेक्षा अधिक स्थानकांवर सेवा होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना व्हॉटसऍपच्या मदतीने जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ची फूड डिलिव्हरी सर्व्हिस झूप (ZOOP) यांनी जिओ हॅप्टिकसोबत मिळून ही एकत्रित सेवा सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ही सेवा 100 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रवाशी आता नवीन व्हॉटसऍप चॅटबोटच्या मदतीने मॅसेज करुन जेवण मागवू शकतात. याच्यासाठी प्रवासी आपला पीएनआर नंबरचा वापर करु शकतात. कारण हा नंबर वापरल्यामुळे प्रवाशाच्या सिटवर जेवणाची ऑर्डर पोहोचणार असल्याची माहिती आहे.
कशी असणार सुविधा
w सर्वात पहिल्यांदा प्रवाशांना मोबाईलमध्ये झूप व्हॉटसऍप चॅटबोट नंबर 917042062070 हा असणे गरजेचे
wव्हॉटसऍपवर झूप चॅटबोट सुरु करावे
wयानंतर आपला 10 अंकी पीएनआर नंबर टाकावा
wझूपने संबंधीत माहिती पडताळून पाहिल्यानंतर पुढील प्रक्रीया करावी लागणार