भजन, आरत्या, दि?डी कार्यक्रमात उशिरा विसर्जन.
वाळपई : शनिवारी रात्री उशिरापर्यंत भजन, आरती, कीर्तन, फुगड्या मिरवणूक, दिंडी अशा विविध सादरीकरणाने पाच दिवशीय गणेश बाप्पाला सत्तरी तालुक्मयात उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळ्या भागांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.सत्तरी तालुक्मयातील बऱ्याच गावांमध्ये पाच दिवस गणपती पूजन करण्यात येते. पाच दिवसानंतर गणपती बाप्पाला थाटात निरोप देण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या गावांमध्ये मंदिर व गणपतीच्या विसर्जनच्या ठिकाणी आरती, भजन, कीर्तन, पारंपरिक फुगड्या, दिंडी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्साही वातावरणात यामध्ये गणेश बाप्पाला निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विसर्जनाचा सोहळा चालला होता. अनेक ठिकाणी रात्री बाराच्या नंतर गणेश विसर्जन करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वितरण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पाचव्या दिवशी गौरीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी भाग घेतला होता.