भारतीय किसान युनियनचे (BKU) शेतकरी सोमवारी जंतर- मंतरवर पोहोचून भारतीय कुस्तीगिर महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात २३ एप्रिलपासून करत असलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठींबा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसारित केलेल्या एका व्हिडियोमद्ये शेतकरी संघटनेचे सदस्यांनी आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना नवी दिल्लीचे डिसीपी प्रणव तायल म्हणाले, “शेतकरी संघटनांच्या एका गटाला जंतरमंतरवर सोडण्यात आले आहे. तर उरलेल्या शेतकऱ्यांनाही धरणे स्थळी जाण्याची धडपड केली. यावेळी काहीजण बॅरिकेड्सवर चढले तर काहीजण खाली पडले. त्यांच्या प्रवेशासाठी पोलिसांच्या पथकाने बॅरिकेड्स मागे ठेवले होते. आंदोलक धरणाच्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि बैठक शांततेत सुरू आहे.” डीसीपी नवी दिल्ली प्रणव तायल यांनी सांगितले.
महिलांसह बीकेयू म्हणजेच एकता उग्रहण या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले होते. त्यानंतर टिकरी सीमेवर निदर्शने केल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी हे घडले आहे. शेतकऱ्य़ांनी बॅरिकेड्स तोडून राजधानीत प्रवेश केला होता.
कुस्तीपटूच्या आंदोलनात सामील होण्यासाठी जंतरमंतरकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मार्गावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 2,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर बंदी घालून खाजगी वाहने आणि बसमधूनच दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.