निलजी येथे लम्पिस्कीनबाबतच्या मार्गदर्शन शिबिरात पशुवैद्यकीय अधिकाऱयांचा सल्ला
वार्ताहर/सांबरा
सध्या पूर्वभागात धुमाकूळ घातलेला लम्पिस्कीन हा विषाणूजन्य त्वचेचा आजार आहे. तो आटोक्मयात आणण्यासाठी शासनामार्फत सर्व सोयी उपलब्ध केल्या असून शेतकऱयांनी घाबरून न जाता यावर वेळीच उपाय केला तर आपले जनावर वाचू शकेल, असा सल्ला वरि÷ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप शांतीनाईक यांनी दिला. ते निलजी येथे शेतकऱयासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य रमेश मोदगेकर होते. बेळगाव तालुक्मयाच्या पूर्वभागातील निलजी या गावात अनेक जनावरे लम्पिस्कीनने बाधित झाली असून शासनाने हा आजार आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. जनतेने घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाने जे आदेश दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे, आपला परिसर स्वच्छ व निर्जंतुक करून जनावरांची काळजी घ्यावी. डास, माशा, गोचीड, पिसवा व दूषित चारा पाणी यांच्यामार्फत हा रोग झपाटय़ाने पसरत चालला आहे. मुखत्वे गाई व बैल या जनावरांना हा रोग होत असल्याने शेतकऱयांनी बाधित जनावराला अन्यत्र हलवून त्यांच्यावर उपाययोजना केल्यास हा रोग आटोक्मयात येण्यास वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तात्काळ लसीकरण मोहीम अवलंबली असून शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना ही लस देऊन या रोगावर नियंत्रण मिळवावे असे विचार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पट्टण यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मोदगेकर, नारायण पाटील यांनीही विचार व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य मधु मोदगेकरसह गावातील बहुसंख नागरिक यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.
ग्रामपंचायतमार्फत डास निर्मूलन फवारणी
निलजी ग्रामपंचायतीतर्फे गावात सोमवारपासून डास निर्मूलन करण्यासाठी गटारीमध्ये औषधांची फवारणी करून निर्जंतुक मोहीम राबवली आहे, ही मोहीम तब्बल आठ दिवस चालणार आहे, जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवून आपल्या घरासमोरील गटारी स्वच्छ ठेवून कचऱयाची विल्हेवाट लावावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.