बेळगाव – अँब्युलन्स आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण धडकेत अँब्युलन्समधील रुग्ण ठार झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील बैलवाड येथे घडली आहे. बैलहोंगल तालुक्यातील बेळवडीचे रहिवासी अकबरसाब नेसरगी (२८) असे मृताची ओळख पटली आहे. सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या प्रांगणात अकबरसाब यांचे बांगड्यांचं दुकान आहे. बेळवडीतून सौंदत्तीला जाताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या अकबरसाबला अँब्युलन्स मधून घेऊन जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अँब्युलन्स धडकली घटनेत स्ट्रेचरवर असलेला अकबरसाब यांचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेले जन्नतबी नेसरगी (४५) मेहबूब (२८) आणि शब्बीर (२२) जखमी झाले आहेत.
Trending
- जिल्हा युवा महोत्सवाचा मुरगूडात शानदार उद्घाटन सोहळा
- मलकापूर येथे गतिमंद युवतीवर केलेल्या अत्याचारा विरोधात शहरवासीय आक्रमक
- पनवेल जवळ मालगाडीला अपघात झाल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
- रायगड किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेमध्ये सापडल्या चरस पिशव्या
- भर पावसात ‘स्वच्छता ही सेवा..1 तारीख 1 तास’
- रत्नागिरी सिंधुदुर्गला वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा
- स्क्वॅशमध्ये भारताचे ऐतिहासिक यश
- रिंगरोडप्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा