वृत्तसंस्था /भुवनेश्वर
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन आणि फिफा यांच्या संयुक्त सहकार्याने येथे जागतिक दर्जाची फुटबॉल अकादमी स्थापन केली जाणार आहे. फिफाच्या टॅलेंट डेव्हलपमेंट योजनेनुसार या अकादमीची स्थापना केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते या अकादमीचे उद्घाटन होणार आहे. देशातील युवा आणि नवोदित फुटबॉलपटूंना या अकादमीमुळे अधिक चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. फुटबॉलपटूंसाठी या अकादमीमध्ये सर्वसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.