गणेशोत्सव जवळ आल्याने परिसरातील नागरिकांची मागणी
बेळगाव : न्यू गुड्सशेड रोड रस्त्यावर 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी पाईप घालण्यात येत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. पाईप घातल्यानंतर त्या सर्व चरी आणि खड्डे बुजविणे गरजेचे होते. मात्र ते अजूनही बुजविण्यात आले नाहीत. आता गणेशोत्सव अगदी जवळ आल्याने तातडीने खड्डे बुजवून दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. न्यू गुड्सशेड रोडवरील नर्तकी थिएटर समोरच अनेक खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. तेव्हा तातडीने ते खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.