वृत्तसंस्था/ बेलग्रेड, सर्बिया
भारताची युवा महिला मल्ल अंतिम पांघलने वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप्समध्ये 53 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले आणि 53 किलो वजन गटात पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळविला.
19 वर्षीय पांघलने स्वीडनच्या दोन वेळच्या युरोपियन चॅम्पियन असलेल्या एम्मा जोना डेनिस माल्मग्रेनचा तांत्रिक सरसतेवर 16-6 असा पराभव केला. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविणारी ती भारताची पहिली मल्ल असून जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती सहावी भारतीय महिला मल्ल आहे.