डिपॉझिट रक्कम परत दिली जात नसल्याचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्या अनागोंदी व्यवहाराचा फटका मागील अनेक वर्षांपासून बेळगावमधील गणेशोत्सव मंडळांना बसत आहे. गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या वीजपुरवठय़ाचा हिशेब मंडळांना दिला जात नसल्याने याचा फटका गणेशोत्सव मंडळांना बसत आहे. त्यामुळे यावषी तरी हेस्कॉमने गणेशोत्सव मंडळांना वीजबिल देऊन उर्वरित रक्कम रोख स्वरुपात द्यावी, अशी मागणी मंडळांमधून होत आहे.
गणेशोत्सव मंडळांना 11 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात मीटर दिले जाते. बेळगाव शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यातील 300 मंडळे हेस्कॉमकडून मीटर घेत असतात. काही मंडळे मंदिर, हॉलमध्ये मूर्तीची प्रति÷ापना करत असल्यामुळे मीटर घेत नाहीत. गणेशोत्सवासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सिंगल विंडो व्यवस्था केली जाते. याच ठिकाणी किलोवॅटनुसार डिपॉझिट रक्कम भरून मंडळांना मीटर दिले जाते.
अंदाजे प्रत्येक मंडळाकडून दहा हजार रुपये डिपॉझिट रक्कम हेस्कॉमकडून घेतली जाते. गणेशोत्सव झाल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचे बिल मंडळांना दिले जात नाही. यामुळे उर्वरित रक्कम हेस्कॉमकडेच रहात असल्याची तक्रार मंडळांकडून होत आहे. त्यामुळे यावषी बिल देण्याची मागणी मंडळांच्या पदाधिकाऱयांकडून होत आहे.
शिल्लक रकमेचा हिशेब हेस्कॉमकडून नाहीच
गणेशोत्सव काळात आम्ही हेस्कॉमकडून वीजपुरवठा घेतो. निश्चित केलेल्या किलोवॅटप्रमाणे हेस्कॉमकडून डिपॉझिट रक्कम भरून घेतली जाते. परंतु गणेशोत्सवानंतर बिलाची किती रक्कम झाली अथवा शिल्लक रकमेचा हिशेब दिला जात नाही. यामुळे मंडळांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
-रणजित हावळाण्णाचे (कोरे गल्ली शहापूर गणेशोत्सव मंडळ)
सर्व मंडळांना बिल उपलब्ध करा
एक खिडकीमधून प्रत्येक मंडळाला वीजपुरवठा देण्यात येतो. परंतु त्याचा हिशेब आजतागायत हेस्कॉमने मंडळांना दिलेला नाही. डिपॉझिट रक्कम भरताना किलोवॅटनुसार पैसे घेता, मग बिल का दिले जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यावषी तरी हेस्कॉमने सर्व मंडळांना बिल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
-दीपक नगरकर (समर्थनगर, गणेशोत्सव मंडळ)
मागणी केल्यास बिल दिले जाते!
कनेक्शन देताना ऍडव्हान्स कंजम्प्शन चार्जेस म्हणून रक्कम स्वीकारली जाते. ज्या मंडळांची रक्कम यापेक्षा अधिक होते त्यांना पत्र देऊन अधिकची रक्कम भरण्यास सांगितले जाते. तसेच ज्यांची कमी होते ती रक्कम संबंधित मंडळाकडून देण्यात आलेल्या एका आर. आर. मीटर क्रमांकावर वर्ग केली जाते. प्रत्येक मंडळाला बिलाचा हिशेब देणे शक्मय नसल्यामुळे ज्यांच्याकडून मागणी होते त्यांना बिल दिले जाते, अशी माहिती त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
-एम. टी. अप्पण्णावर (कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)