प्रतिनिधी /बेळगाव
20 ऑगस्ट या दिवशी रात्री 8 वाजता फिश मार्केट कॅम्प येथे पोलीस कॉन्स्टेबल रहदारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱया पोलिसांवर समाजकंटकांनी आक्रमण केले होते. गेल्या काही दिवसांपासून सरकारी पोलीस कर्मचाऱयांवर आक्रमण होण्याचे प्रमाण एका विशिष्ट समाजाच्या समाजकंटक युवा कार्यकर्त्यांकडून बेळगावात वाढले आहे.
तरी पोलिसांवर आक्रमण करणाऱया समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे मराठा समाजाचे नेते व कर्नाटक राज्य भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सरचिटणीस किरण जाधव यांनी कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबतीत किरण जाधव यांनी प्रसारमाध्यमांना सांगताना म्हणाले, शुक्रवारी रात्री फिश मार्केट येथून रात्री जातेवेळी एका पोलीस कॉन्स्टेबलवर काही समाजकंटक अरेरावी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी किरण जाधव यांना पाहताच ठाकूर हार्डवेअर शॉपच्या बाजूच्या बोळातून समाजकंटक पसार झाले. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पोलीस अधिकाऱयांना घेऊन त्याठिकाणी पंचनामा करून समाजकंटकांना शोधून कारवाई करण्यात यावी, अशी सूचना जाधव यांनी पोलीस अधिकाऱयांना केली आहे. यावेळी सुनील जाधव, अक्षय साळवी, अभिषेक वेर्णेकर, सामाजिक कार्यकर्ते राजन जाधवसह अन्य उपस्थित होते.