प्रतिनिधी /पेडणे
सोमवारी संध्याकाळी मालपे रेल्वे स्टेशन जवळ एक खडय़ात पडलेल्या गाईला अग्निशामक दलाकडून खडय़ातून वर काढून जीवादान देण्यात आले.
एक गाय मालपे येथे खड्डय़ात पडल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले .एका खोल खडय़ात ही गाय जवळ जवळ दोन दिवस पडून होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता, गायीला वर काढून जीवदान दिले.
यात अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, हवालदार डा?मनिक मार्टिन, चालक विठ्ठल परब, जवान सहदेव चोडणकर, जवान यशवंत नाईक , जवान संदेश पेडणेकर यांनी गायीला वर काढून जीवदान दिले.