ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास (Naba Das) यांच्यावर पोलिसांच्या वेशातील हल्लेखोराने गोळीबार केला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. दास यांच्या छातीत 4 ते 5 गोळ्या लागल्या असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
नाबा दास आज दुपारी ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात होते. कार्यक्रमस्थळी पोहचल्यावर नाबा दास गाडीतून उतरताच सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असलेल्या तोतया एएसआय गोपाळ दास याने त्यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दास गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : आपला संकुचितपणा मराठीसाठी घातक