प्रतिनिधी /पणजी
पहिली आंतरराष्ट्रीय पर्यावरण शाश्वत बैठक आजपासून गोव्यात सुरू होत आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेमध्ये देश विदेशातील नामवंत आणि तज्ञ मंडळी सहभागी होत आहेत. भवितव्यातील शाश्वत पर्यावरण हा त्याचा विषय असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सकाळी 10.30 वाजता उद्घाटन करणार आहेत.
डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयम सभागृहात होणाऱ्या या परिषदेची सारी तयारी पूर्ण झाली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या परिषदेचे यजमान हे आज स. 10 वा. पासून परिषदेला गोव्यात प्रारंभ होत आहे. माजी केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री सुरेश प्रभू हे यावेळी खास वक्ते म्हणून उपस्थित रहाणार आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास मुख्य सचिव डॉ. पुनितकुमार गोयल तसेच गोव्याचे पर्यावरण सचिव अरुण कुमार मिश्रा हे देखील उपस्थित रहातील.
दुपारी 12 वा. पासून पर्यावरण विषयक अनेक परिसंवादाना प्रारंभ होईल. हवामान व त्या अनुषंगाने कृती या विषयावरील परिसंवादामध्ये संजय खरे हे स्कोडा ऑटो वॉक्सवेगन इंडियाचे उपाध्यक्ष आहेत ते सहभागी होतील व त्यात बिकास सिंग, अनिषा सौझा, पेस श्रीनिवास हे आपले विचार मांडतील.
दुपारच्या द्वितीय सत्रात डॉ. रंजना अरोरा युरोपियन युनियन गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादामध्ये हेमंत चौधरी रेहा सिंघल, धनश्री पांडा, नरेश त्यागी हे सहभागी होतील.
सायंकाळच्या परिसंवादामध्ये डॉ. आदिती हलधर या प्रमुख असतील. रिलायन्सचे राज मुळीक तसेच शंतनू रॉय, प्रतीक घोष, रेघु कुमार इत्यादी सहभागी होतील. तसेच उद्या व परवा अशा दोन दिवसांमध्ये विविध परिसंवाद तथा चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. आर मुकूंदम, डॉ. सुरेश बाबू, डॉ. संतनू सत्पती, तेजश्री जोशी, रिबिरथ सेन, अमरजीत सिंग, रोहित शिंपी, बोस वर्गिस, डॉ. सुकुमार देवदत्त, श्याम असोलेकर, डॉ. एम. पी. पाटील, प्रियेश भट्टी, डॉ. किशोर मालविया, डॉ. प्रशांत गार्गव, डॉ. नितीन लमशेटवार, डॉ. राजीव गौतम, डॉ. प्रितेश शहा, भय्या श्रीवास्तव, विघ्नेश कानेरिया, डॉ. अतुल वैद्य, डॉ. युजी मुनेरो, राजीव सुपेकर, डॉ. अमित बंसिवाल, रे ने व्हॅन बेटकेल, बॉबी कुरियन, तरुण जामी, एन. चंद्रशेखर, मोहित सिंघवी, डॉ. पवन कुलकर्णी इत्यादी सहभागी होणार आहेत.
भुपेंदर यादव येणार
दरम्यान, केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंदर यादव हे या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. समारोप समारंभ दुपारी 2 वाजता सुरु होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, केंद्रीय पर्यावरण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे इत्यादी यावेळी उपस्थित रहाणार आहेत.