रणवीर सिंह अन् आलिया भट्टचा नवा चित्रपट
गली बॉयनंतर पुन्हा एकदा रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये एकत्र दिसून येणार आहेत. करण जौहरने स्वत:च्या या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जौहरने केले आहे.
या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन, अंजली दिनेश आनंद, क्षिती जोग आणि आमिर वसीर, शबाना आझमी, टोटो रॉय चौधरी आणि चुरनी गांगुली हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट दोन कुटुंबांची कहाणी दर्शविणारा आहे. कुटुंबाची शक्तीच प्रेमाचे भविष्य निश्चित करते असे करण जौहरने या चित्रपटाचे पोस्टर्स सादर करत नमूद केले आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात रणवीर सिंह हा ‘रॉकी’ तर आलिया भट्ट ही ‘रानी’ची भूमिका साकारत आहे. यातील रणवीरचा लुक अत्यंत एनर्जेटिक दिसून येत आहे. हा चित्रपट करण जौहरचा अत्यंत बिगबजेट चित्रपट असल्याने त्याने याकरता मोठी तयारी केली आहे.