दैनंदिन जीवनाशी संबंधीत अनेक गोष्टींमध्ये होणार बदल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
1 जून 2023 पासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक कार घेणे महाग झाले आहे. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या असून यासह अन्य बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया.
1.इलेक्ट्रिक कार खरेदी करणे महाग
अवजड उद्योग मंत्रालयाने 19 मे रोजी दुचाकी एफइएम-2 वरील अनुदान सध्याच्या 15,000 रुपये प्रति किलोवॅटवरून 10,000 रुपये प्रति किलोवॅटपर्यंत कमी करण्यासाठी आणि कमाल अनुदान मर्यादा 40 टक्क्यांवरून 15टक्केपर्यंत कमी करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होणार आहे.
2.राष्ट्रपती भवन जनतेसाठी 6 दिवस खुले
आता राष्ट्रपती भवन पाहण्याची सुविधा सर्वसामान्य नागरिकांना 5 दिवसांऐवजी आठवड्यातून 6 दिवस उपलब्ध होणार आहे. मंगळवार ते रविवार सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 या वेळेत राष्ट्रपती भवनाला सात वेळा भेट देता येणार आहे. राष्ट्रपती भवनात शनिवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत लोकांना चेंज ऑफ गार्ड सोहळाही पाहता येणार आहे.
3.बँक लोकांचे पैसे करणार परत
बँकांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी पडून आहेत. हे पैसे मालक किंवा वारसांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक 1 जूनपासून मोहीम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत, बँक 100 दिवसांत पहिल्या 100 ठेवीवर दावा न केलेले पैसे त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे.
4.एटीएफच्या किमतीत कपात
एलपीजीशिवाय तेल कंपन्यांनीही एटीएफच्या किमतीत कपात केली आहे. दिल्लीतील एटीएफची किंमत 95,935.34 रुपयांच्या तुलनेत 89,303.09 रुपये झाली आहे. मुंबईत पूर्वीची किंमत 89,348.60 रुपये प्रति किलोलीटर होती, जी आता 83,413.96 रुपये प्रति किलोलीटर होईल. कोलकात्यात हा दर 95,963.95 रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये 93,041.33 रुपये प्रति किलोलिटर इतका खाली आला आहे.
5.पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल नाही
गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.