अवकाळी पावसामुळे प्लास्टीक ताडपत्रीच्या दुकानात मान्सूनपुर्वीच ग्राहकांची गर्दी
प्रतिनिधी /फोंडा
अवकाळी पावसाने उडविलेल्या धांदलीमुळे मान्सुनपुर्व खरेदीसाठी फोंडा बाजारातील प्लास्टीक आच्छादनाच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडालेली आहे. मान्सूनचे आगमन पंधरा दिवासावर असले तरी यंदा दर महिन्याला पाऊसाच्या सरी बरसत असल्यामुळे घराची शाकारणी व प्लास्टीक आच्छांदनाने झाकून घेण्याची लगबग मान्सूनच्या अवधीपुर्वीच सुरू केलेली आहे. तसेच मालवाहू टेम्पोंवाल्यानीही प्लास्टीक पाडपत्रीच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
फोंडा शहरातील बुधवार पेठ बाजार परिसरात, बागायतदार बाजारजवळ, तसेच केशव देव मंदिराजवळील प्लास्टिक आच्छांदनाच्या दुकानावर झुंबड होती. सद्या पावसाळी साहित्य अजूनपर्यंत पुर्ण क्षमतेने बाजरात व रस्त्याच्या कडेला बसणाऱया फेरीवाल्याकडे उपलब्ध न झाल्यामुळेही ही गर्दी पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी कामावरून घरी परतण्याच्या मार्गावर असताना प्लास्टीक आच्छादनाची खरेदी करण्याचा मार्ग पत्करल्यामुळे येथील अरूंद रस्त्यावर वाहतुकीचीही कोंडी होताना दिसत आहे.