आकाशगंगा स्काय डायव्हर्सनी पॅराशूटद्वारे साकारला तिरंगा
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू वायुतळावर पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा एअर शो आयोजित झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाला 76 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि जम्मू वायुदल स्थानकाच्या डायमंड जुबलीनिमित्त पहिल्यांदाच अशाप्रकारचा एअर शो आयोजित करण्यात आला आहे.
या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम हॉक एमके 132 विमानांद्वारे देशाच्या सामर्थ्याची प्रचिती दिली आहे. याचबरोबर एमआय-17 हेलिकॉप्टरच्या प्रदर्शनासोबत एअर वॉरियल ड्रिल टीम, आकाशगंगा डेयरडेव्हिल स्काय डायव्हिंग टीमने आकाशात स्वत:च्या कौशल्यांचे सादरीकरण केले. या एअर शोमध्ये वायुदलाच्या एअर वॉरियल सिम्फनी ऑकेस्ट्राचे सादरीकरण होणार होते, परंतु खराब हवामानाचा यात अडथळा आला. हा एअर शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक पोहोचले होते.
एअर शोच्या पहिल्या भागात 9 विमानांसाब्sात विविध फॉर्मेशन्स तयार करण्यात आली आणि वॉरफेयर दर्शविण्यात आले. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने डायमंड, मेजर, तेजस, वाय फॉर्मेशनद्वारे फ्लाइट्सची अचुकता दाखवून दिली आहे. दुसऱ्या भागात आधुनिक लढाऊ विमान काय करू शकते दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.