बेंगळूर / वृत्तसंस्था
भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार एल्वेरा ब्रिट्टो यांचे मंगळवारी निधन झाले. निधनसमयी त्या 81 वर्षांच्या होत्या. 1960 ते 1967 या कालावधीत स्थानिक हॉकीचे युग गाजवणाऱया 3 लोकप्रिय बिट्टो भगिनींमध्ये एल्वेरा यांचा समावेश होता. या भगिनींनी कर्नाटकला 7 राष्ट्रीय जेतेपदे मिळवून दिली. एल्वेरा यांनी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका व जपानविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. 1965 मध्ये एल्वेरा अर्जुन पुरस्काराने सन्मानित दुसरी महिला हॉकीपटू ठरल्या. त्यापूर्वी 1961 मध्ये ऍने लमस्डेन यांना हा सन्मान लाभला होता. रिता व माई या अन्य भगिनींप्रमाणेच एल्वेरा या देखील अविवाहित राहिल्या.