पंढरपूर प्रतिनिधी
छगन भुजबळ यांच्यावर मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप होता ते माझ्यासोबतच पावणे दोन वर्षे जेलमध्ये होते. जेलमधून सुटका करून घेण्यासाठी भुजबळ नव्या आजाराची कारणे शोधायचे परंतु त्यांना जामीन मिळाला नव्हता, जामीन करून घेण्यासाठी भुजबळ यांनी शरद पवार आणि पक्षाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानेच त्यांना जामीन मिळाला असल्याचा गौफ्यस्फोट मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ मतदारसंघाचा गाव भेट दौरा सुरू केला आहे. गुरुवारी पंढरपूरमध्ये त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला
पुढे बोलताना माजी आमदार कदम म्हणाले की राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी जेलमधून सुटका करून घेण्यासाठी खूप युक्त्या लढविल्या आहेत सर्व करून सुद्धा जामीन मिळत नसल्याने त्यांनी शेवटी पक्षाला व पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे भुजबळ यांच्यासारख्या युक्त्या मी वापरल्या असत्या तर माझा ही जामीन लगेच झाला असता परंतु मी निर्दोष आहे हे मला न्यायालयात सिद्ध करायचे होते त्यासाठी मी आठ वर्षे जेलमध्ये काढली आहेत. आपल्यापेक्षा मोठे घोटाळे करणारे जेलमधून बाहेर पडले देशात आणि महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयांचे घोटाळे झाले त्यांच्यावर आरोप झाले ते लोक काही महिन्यात तर काही एक दोन वर्षात जमीनवर बाहेर पडल्याचा इतिहास असल्याचेही कदम यांनी यावेळी सांगितले.
जेलमध्ये असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे रोज आजारी पडत होते. सध्या ते जेलच्या बाहेर आहेत आता तसे काही दिसत नसून उलट ते फिट असल्याचा टोला देखील कदम यांनी लावला आहे. माझ्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय आणि शासकीय यंत्रणेच्या द्वेषातून झालेले आहेत मी एक रुपयांचा घोटाळा केलेला नाही हे मी न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे माझ्या पक्षातील आणि काही विरोधकांनी माझ्याविरुद्ध रचलेले हे कटकारस्थान होते. पोलिसांनी माझ्याविरुद्ध पुन्हा दाखल केला असला तरी ते सिद्ध करू शकले नाहीत मात्र या आरोपातून मुक्त होण्यासाठी मला आठ वर्षे जेलमध्ये रहावे लागले आहे.
माजी आमदार रमेश कदम यांनी गाव भेट दौरा सुरू केला आहे.यामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून अनेक पक्ष मला पक्षात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. सध्या मी कोणत्याही पक्षात नाही मतदार संघातील लोकांशी बोलून मी राजकीय भूमिका घेणार असल्याचे माजी आमदार कदम यांनी सांगितले.