ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं आज निधन (pervez musharraf) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बऱ्याच दिवसांपासून परवेज मुशर्रफ यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
परवेज मुशर्रफ २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. तर मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ या काळात पाकिस्तानवर राज्य केले आहे.