मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : 1988 साली उभारला होता जुना अरुंद पूल
उदय सावंत /सावर्डे
गोवामुक्ती नंतर सत्तरी तालुक्यातील लोकांची गरज म्हणून सावर्डे व पैकुळ पुलाची उभारणी करण्यात आली होती. 2021 साली पुरामुळे सदर पूल कोसळला त्यानंतर याठिकाणी गोवा सरकारच्या पायाभूत साधन सुविधा मंडळातर्फे 19 कोटी खर्च करून नव्याने पूल उभारला. या पुलाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 1988 साली त्यावेळची गरज म्हणून बांधलेले सावर्डे पूल नव्याने उभारण्यासाठी पायाभरणी दोन महिन्यांत हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
गावाच्या कक्षा ऊंदावत आहेत. गावाचे शहरीकरण होऊ लागले आहे. सदर ठिकाणी सावर्डे माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयाकडे जाणारा विद्यार्थी वर्ग सभोवतील गावातील आहे. यामुळे या पुलावरून जावे लागते. मात्र प्रवासी बसेस जात नसल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ लागलेली आहे. वाढत्या दळवळणासाठी ऊंद पुलाची उभारणी होणे ही काळाची गरज आहे. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी रुंद पुलांची मागणी केली जात आहे. या संदर्भाचा प्रस्ताव आमदार विश्वजित राणे यांनी सरकारला सादर केला आहे. एकूण पूल पूर्ण झाल्यानंतर आता सावर्डे पूल कधी अशा प्रकारचा सवाल नागरिकाकडून व्यक्त करण्यात येत होता. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या पुलाच्या पायाभरणीबाबत सुतोवाच केल्याने लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लाकडांचा चोरटी वाहतूक रोखण्यासाठी अरुंद पुलाची संकल्पना
दरम्यान, सावर्डे अऊंद स्वरूपाचा आहे. त्या ठिकाणी प्रवासी बसेस नेता येत नाहीत. हा अऊंद पूल बांधण्याचे कारण काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे. याची माहिती जाणून घेतली असता सत्तरी तालुका हा पूर्णपणे जंगल समृद्धीने भरलेला आहे. त्यावेळी वनखात्याची यंत्रणा सक्रिय नव्हती. यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल तोडीचे प्रकार होऊ लागले होते. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे निसर्ग प्रेमी आहेत. जंगल तोडीचे बाबतीत ते कट्टर विरोधात होते. यामुळे त्यांनी सदर पूल बांधताना ऊंद स्वरूपाचा पूल उभारल्यास या पुलाचा वापर चोरट्या पद्धतीने लाकडाची वाहतूक करण्यासाठी होऊ शकतो. याची विशेष दखल घेऊन त्यांनी अऊंद स्वरूपाच्या पुलाची उभारणी केली. त्यावेळी नागरिकांच्या येण्याजाण्याची गरज म्हणून हा पूल उभारण्यात आला होता. मात्र आता त्याची मोठ्या प्रमाणात अडचण होऊ लागलेली आहे.
प्रतापसिंह राणे यांनी केली होती पुलाची पायाभरणी
सावर्डे अऊंद पुलाची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यामुळे सभोवताली नागरिकांची चांगल्या प्रकारची सोय झाली. तत्पूर्वी पूल पार करण्यासाठी साकवाचा वापर होत होता. 1988 साली सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोजा व स्थानिक आमदार अशोक प्रभू यांच्या उपस्थिती या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
पुलामुळे गावाच्या विकासाला चालना : वासुदेव नेने
जुने सावर्डे पूल उभारले. त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तत्कालीन सरपंच वासुदेव नेने यांच्याशी संवाद साधला. त्या पुलाची उभारणी केल्यानंतरच विकासाला चांगल्या प्रकारची चालना मिळाली. त्यापूर्वी जीव मुठित धरून भागातील नागरिकांनी साकवाच्या मदतीने नदी पार करावी लागत असे. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन प्रतापसिंह राणे यांच्या प्रयत्नातून पूल बांधण्यात आले. आपल्या कारकीर्दीत हा पुल साकार झाल्यामुळे त्याचा आपल्याला अभिमान वाटता,s अशी प्रतिक्रिया वासुदेव नेने यांनी व्यक्त केली. सदर पुलावरून दुचाकी तिचाकी व लहान चार चाकी वाहने जातात. मात्र मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. आता काळानुसार ऊंद फुलाची गरज असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भाची घोषणा केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.