ऑनलाईन टीम/तरुण भारत
नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. यांनतर अनके जणांनी निपूर शर्माचे समर्थन केले होते. अशाच नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
भाजपाच्या नुपूर शर्मा प्रकरणावरून अमरावतीमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून देशासह जगभरातून या वक्तव्याचा निषेध केला जात होता. त्यावरून भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. तथापि, नुपूर शर्मा यांच्या त्या वक्तव्याचे काहींनी समर्थन केले आहे. त्यातूनच अमरावतीमध्ये (Amaravati) उमेश कोल्हे तर, उदपूरमध्ये (Udaypur) शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. तर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नुपूर शर्माचं या सर्व प्रकरणाला जबाबदार असल्याचे म्हणत टीव्ही समोर सकाम्पुर्ण देशवासीयांची माफी मागण्यास सांगितले होते.
अशा प्रकरणांचा शोध घेत पोलिसांनी धरपकड सुरू केली असून लोकांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांना गजाआड करण्यात आले आहे. या चौघांची चौकशी सुरू असून त्यानंतरच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचा निश्चित केले जाईल, असे शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निलिमा अराज यांनी सांगितले.