ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तराखंडमधील द्रोपदीच्या दांडा-2 पर्वताच्या शिखराजवळ झालेल्या हिमस्खलनात 4 प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जणांना वाचविण्यात यश आले आहे. आणखी 29 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. हे सर्व गिर्यारोहक नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिअरिंगमधील आहेत. अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून एसडीआरएफची टीम रवाना झाली आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील दौपदीच्या दांडा-2 पर्वताच्या शिखरावर 41 गिर्यारोहकांचा एक गट प्रशिक्षण घेत होता. या शिवराजवळ झालेल्या हिमस्खलनात सर्वजण अडकले होते. 34 प्रशिक्षणार्थी आणि 7 ट्रेनर यांचा यात समावेश होता. त्यामधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन प्रशिक्षकांचा समावेश आहे. ते उत्तरकाशी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. 8 जणांना वाचविण्यात यश आले असून, 29 बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध सुरू आहे. हे ठिकाण 5,006 मीटर उंचीवर आहे. घटनास्थळी NIM च्या टीमसह जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, लष्करी जवान आणि ITBP चे जवान सक्रिय झाले असून, वेगाने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिमस्खलनात दोन प्रशिक्षकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री धामी यांच्याशीही बोलून घटनेची माहिती घेतली. त्यांनी हवाई दलाला बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अधिक वाचा : जळगावातून शिंदे गटाचे 25 हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना