जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
बेळगाव : दिल्ली येथे संयुक्त भारत खेल फेडरेशन आयोजित आठव्या राष्ट्रीय गेम अॅथलेटिक्स स्पर्धेत बेळगावचे ज्येष्ठ धावपटू सुरेश देवरमनी यांनी चार विविध प्रकारात भाग घेऊन चार सुवर्णपदकांची लयलूट करीत 10 राष्ट्रांच्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुरेश लक्ष्मण देवरमनी यांनी 10 किमी धावणे, 5 किमी धावणे, 1500 मी. धावणे व 5 किमी वॉक स्पर्धेत प्रथम क्रमांकासह 4 सुवर्णपदके पटकाविली आहेत. या कामगिरीची दखल घेऊन जुलैमध्ये दुबई येथे होणाऱ्या 10 प्रमुख राष्ट्राच्या जागतिक स्पर्धेत सुरेश देवरमनी यांची भारतीय संघाच्या निवड झाली आहे. या स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.