ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित चौघांना गुजरात एटीएसने पोरबंदरमधून अटक केली आहे. त्यामध्ये एका परदेशी नागरिकाचाही समावेश आहे. एटीएसच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
Gujarat | ATS has arrested 4 persons including a foreign national from Porbandar. It has been revealed that these people have links with international terrorist organisations. A special team of ATS was active for the past few days for special operations in Porbandar and…
— ANI (@ANI) June 10, 2023
एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते. या पथकाला एका परदेशी नागरिकाच्या माध्यमातून तीनजण आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित परदेशी नागरिकासह चौघांना एटीएसने ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.