वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅपल आयफोनची निर्मिती करणाऱ्या भारतातील फॉक्सकॉन कंपनीकडून आगामी काळामध्ये हजारो जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पुढील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये फॉक्सकॉन कंपनी 53 हजार जणांना भारतात नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे. एका अधिकाऱ्याने या संदर्भातली माहिती दिली आहे.
अॅपलची सर्वात मोठी निर्यातक कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनला भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करायची आहे. तैवानमधली मुळची असणाऱ्या या कंपनीने आतापर्यंत 40 हजार जणांना कंपनीत सामावून घेतले आहे. कंपनीचा तामिळनाडूमध्ये कारखाना आहे. कंपनीला दक्षिण राज्यांमध्ये आपला विस्तार करायचा असून या अनुषंगाने नव्या उमेदवारांची भरती कंपनी नजिकच्या काळात करणार आहे.
आगामी दोन वर्षांमध्ये 53 हजार जणांना कंपनीत सामावून घेतलं जाणार असून ही संख्या 70 हजारपर्यंत वाढवली जाणार आहे. कर्नाटकामध्ये कंपनीचे दोन प्रकल्प साकारले जाणार असून याकरिता 600 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने केली आहे.