मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेंगळुरात शक्ती योजनेला चालना : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचीही राहणार उपस्थिती
प्रतिनिधी/वार्ताहर / बेंगळूर
राज्य सरकारच्या ‘शक्ती’ योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिलांना राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या रविवारी दि. 11 जून रोजी बेंगळुरातून या योजनेला चालना देणार असून दुपारी 1 नंतर महिला बसमधून मोफत प्रवास करू शकतात. या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सर्व महिलांसाठी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (केएसआरटीसी), बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी), नॉर्थ वेस्ट कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनडब्लू केएसआरटीसी), कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (केकेआरटीसी)च्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 11 जूनपासून या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 5 जून रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.
शक्ती योजनेची ठळक मुद्दे
मोफत प्रवास सुविधा फक्त कर्नाटकातील महिलांसह विद्यार्थिनींना लागू आहे. महिलांना राज्यभरात केवळ केएसआरटीसीच्या शहर वाहतूक, सामान्य आणि एक्स्प्रेस (अतिजलदसह) वाहतुकीत मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राजहंस, वातानुकूलित बिगर वातानुकूलित आरामदायी, ऐरावत, ऐरावत क्लब क्लास, अंबारी, अंबारी ड्रीम क्लास, अंबरी उत्सव, फ्लाय बस, ईव्ही प्लस बस या लक्झरी बसेसवर मोफत प्रवासाची सुविधा लागू असणार नाही. ही प्रवास सुविधा केवळ राज्यांतर्गत प्रवासासाठी लागू असणार आहे. शक्ती योजनेचे दैनिक पास, मासिक पास, अधूनमधून करार आणि कायमस्वरुपी करार पॅकेज यासारख्या सेवांसाठी लागू असणार नाही.
परिवहन बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी महिलांना पुढील कागदपत्रे दाखविणे बंधनकारक आहे. आधारकार्ड, निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र, चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) भारत सरकारचे विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमशिल संस्था यांनी जारी केलेले ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण संचालनालयाने जारी केलेले ओळखपत्र बसमध्ये लग्नाराहे
कंडक्टरच्या जबाबदाऱ्या
काही निवडक आंतरराज्य वाहतूक वगळता इतर आंतरराज्य परिवहनांवर महिलांना मोफत प्रवास करण्याची परवानगी नाही. याबद्दल महिलांना माहिती देण्यासाठी आदरपूर्वक माहिती सांगावी. या योजनेंतर्गत दिलेले मोफत प्रवासाचे तिकीट मोफत मानले जाऊ नये. या तिकिटांपैकी कर्नाटक सरकार वितरणातून मिळालेली रक्कम परत करेल, असे त्यात म्हटले आहे. वाहनातील सर्व प्रवाशांना तिकीट देण्याच्या पद्धतीनुसार सर्व महिला व विद्यार्थ्यांना मोफत शून्य रकमेची तिकिटे देणे बंधनकारक आहे. वर नमूद केलेल्या कागद पत्रांशिवाय इतर कोणत्याही कागद पत्रे दाखविल्यास महिला प्रवाशांना परवानगी द्यावे लागेल. डिजीलॉकरद्वारे सादर केलेल्या आयडीचे प्रमाणीकरण मान्य असणार आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
राज्य परिवहन महामंडळाने बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याच्या अनुषंगाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना बसस्थानके आणि बसमध्ये महिला प्रवासी यांच्याशी सौजन्याने वागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलांना प्रवास करताना शून्य भाडे असणारे तिकीट देण्यासाठी सध्याची ईटीएम (इलेक्ट्रॉनिक टिकेट मशीन) बदलण्यास सांगितले आहे.
राज्यातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या महिला नियमित आणि एक्स्प्रेस (जलदगती) बसने राज्यात कुठेही प्रवास करू शकतात. कंडक्टरने महिला प्रवाशांना ठिकाण विचारून भाडे नमूद करावे आणि महिलांना शून्य तिकीट द्यावे. जर मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास त्यांना गुलाबी रंगाची तिकिटे देण्याचीही सूचना देण्यात आलेली आहे. तिकीट न देण्याबाबत कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास, तसेच या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या व्यक्तींना जर तिकीट वाटप केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शून्य तिकीट दुर्लक्षित केले जाऊ नये. सरकारी महामंडळांना तिकिटाची रक्कम अदा करण्याच्या आधारे प्रवाशांची आकडेवारी द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
महिलांना प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- महिला मोफत प्रवास शक्ती स्मार्ट कार्ड
- राज्य सरकारने प्रमाणित केलेले रहिवासी नोंदणी पत्र
- केंद्र/राज्य सरकारनी प्रमाणित केलेले ओळखपत्र
- अपंग/ दिव्यांग प्रमाणपत्र किंवा ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग यांचे ओळखपत्र
प्रतिक्रिया
सीमाभागात 20 कि.मी.पर्यंत महिलांना मोफत बसप्रवास
‘शक्ती’ योजनेअंतर्गत राज्याच्या सीमेपासून 20 कि.मी. हद्दीपर्यंत महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करता येईल. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, परिवहन मंत्री रामलिंगारे•ाr यांच्या उपस्थितीत रविवारी विधानसौधमध्ये शक्ती योजनेला चालना दिली जाईल.
सिद्धरामय्या, मुख्यमंत्री