प्रतिनिधी/ बेळगाव
आंबोली गावात नेत्रदर्शन आय हॉस्पिटल आणि लोककल्प फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 48 ऊग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. या उपक्रमाने डोळ्यांच्या आरोग्याची सुलभता सुधारण्यात आणि मोतीबिंदू प्रतिबंध आणि उपचारांबद्दल जागरुकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नेत्रदर्शन नेत्र ऊग्णालय त्यांच्या कुशल नेत्ररोग तज्ञांच्या टीमसह प्रगत तंत्रज्ञान आणि ऊग्ण-केंद्रित काळजीसाठी सर्वपरिचित आहे.
लोककल्प फाउंडेशन ही संस्था वंचित लोकांची सेवा करण्यासाठी आणि आरोग्य सेवेतील दरी भरून काढण्यासाठी वचनबद्ध आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी दत्तक घेतलेल्या 32 गावांना वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि संसाधने पुरविण्यावर फाऊंडेशनचा भर आहे. मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदूशी संबंधित सेवा प्रदान करण्याचा लोककल्प फाऊंडेशनचा उद्देश होता.
या शिबिरात केवळ मोफत नेत्रतपासणीच नाही तर मोतीबिंदू प्रतिबंध आणि उपचारांबाबत जनजागृती करण्यावर भर दिला गेला आणि मोफत चष्मेही दिले जाणार आहेत. लोककल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक प्रितेश पोटेकर, संतोष कदम आणि सुहासिनी पेडणेकर, ऑप्टोमेट्रिस्ट आयराफ, विशाल उपस्थित होते.