ट्रान्सपोर्ट विभागाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून जगामधील राजकीय व भौगोलिक स्थितीमधील बदलानंतर त्याचा परिणाम भारतीय उद्योग क्षेत्रासह अन्य घटकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, महागाईचा वाढलेला भडका यांचाही प्रभाव राहिला आहे.
या सर्व घडामोडीत इंधनाच्या वाढलेल्या दराचा परिणाम हा मालाची वाहतूक करणाऱया विभागावर राहिला आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या माहितीनुसार जवळपास ट्रान्सपोर्ट विभाग आता हा बोजा थेट ग्राहकांवर टाकत मालाची भाडेवाढ करण्यास सुरुवात करत आहे. देशातील 159 ट्रान्सपोर्ट रुट्समधील (मार्ग) 143 (90 टक्के) रुट्सवरील मालाचा पुरवठा करताना भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगितले आहे. याच दरम्यान ट्रकांचे कार्य स्थिर व्हावे, मालभाडे वाढल्याने क्रिसिल रिचर्सचे पॅन इंडिया प्रेट इंडेक्स आतापर्यंत सर्वात उच्चस्तर 129 वर पोहोचला आहे.
सर्व क्षेत्रात वाढ
दरम्यान सर्व क्षेत्रात भाडेवाढ करण्यात आली आहे. यामध्ये एफएमसीजीची उत्पादने, खुले सामान आणि खनिज मालाचा भाडेवाढीत समावेश आहे.