वृत्तसंस्था/ पॅरिस
2018 सालातील फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया फ्रान्स संघातील फुटबॉलपटू 35 वर्षीय ब्लेसी मेटुडीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली. 2018 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा दुसऱयांदा जिंकणाऱया फ्रान्स फुटबॉल संघामध्ये मेटुडीचा समावेश होता. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत मेटुडीने लेस ब्लुस क्लबतर्फे 84 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. मेटुडीने पॅरिस सेंट जर्मन क्लबचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या संघाला चार वेळा प्रेंच लिग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. पीएसजी क्लबकडून त्याने 295 सामन्यात 33 गोल नेंदविले आहेत.