तरुणींचे फोटो वापरून क्लुप्ती पीएसआय होण्याअगोदरच फसवणूक प्रकरणी अडकला पोलिसांच्या जाळय़ात
प्रतिनिधी / बेळगाव
पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी त्याची तयारी सुरू आहे. त्याने शारीरिक चाचणीही पूर्ण केली आहे. मात्र पीएसआय होण्याआधीच तो फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या जाळय़ात अडकला आहे. नाईंग्लज येथील एका तरुणाची ही कथा असून बेळगाव येथील एका तरुणीच्या नावे फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडून त्याने तब्बल 20 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी महांतेश मुडसे (वय 29, रा. नाईंग्लज, ता. चिकोडी) या तरुणाला अटक केली आहे. तीन वर्षांत सोशल मीडियावर तरुणींच्या नावे खोटे अकाऊंट काढून महांतेशने सावजांना चांगलेच धुतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.
प्रत्यक्षात 20 जुलै रोजी महांतेशला अटक झाली आहे. हा प्रकार उशिरा उघडकीस आला आहे. सावजांना ठकविण्यासाठी या तरुणाने तब्बल सहा बँक खाती खोलली होती. या खात्यात सावजांकडून त्याने 19 लाख 80 हजार रुपये भरून घेतले असून रक्कम जमा करून घेतल्यानंतर त्या सावजांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करून हा तरुण त्यांच्याशी संपर्कच तोडतो.
उपलब्ध माहितीनुसार एम. स्नेहा या नावाने फेसबुक व इन्स्टाग्रामवर महांतेशने खोटे अकाऊंट उघडले होते. वेगवेगळय़ा तरुणांना महांतेश फेसबुकवर प्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. थोडीशी चॅटिंग केल्याने आपल्याला पैशाची गरज आहे. 10-15 हजार रुपये जमा करा, अशी मागणी करायचा.
सुंदर तरुणीशी आपली मैत्री जुळणार या आशेने अनेक सावजांनी त्याच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत.
केवळ चॅटिंगवरून समाधान झाले नाही तर सावज मोबाईल क्रमांकाची विचारणा करायचे. आधी माझ्या खात्यावर रक्कम जमा करा. नंतरच तुम्हाला मोबाईल क्रमांक देतो, मस्त गप्पा मारूया, असे सांगत तो सावजांना आपल्या जाळय़ात ओढत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरू आहे. बेळगाव येथील स्नेहा नामक तरुणी दुबईत राहते. तिच्या फोटोंचा महांतेशने फेसबुकसाठी वापर केला होता.
अनेक परिचितांनी स्नेहाशी संपर्क साधून तुझ्या फोटोंचा गैरवापर सुरू असल्याचे सांगत तिला सावध केले होते. खऱया स्नेहाने खोटे अकाऊंट उघडणाऱया महांतेशशी संपर्क साधून आपल्याबद्दल नाहक संशय निर्माण होत आहे. त्यामुळे आपले फोटो त्वरित बाजूला काढ, अशी विनंती केली होती. त्यानंतरही महांतेशने आपला उद्योग सुरू ठेवला होता. खऱया स्नेहाचे फोटो वापरुन तो खोटे अकाऊंट चालवत होता. अखेर स्नेहाने 4 जुलै रोजी सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी महांतेशला अटक केली आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. व्हॉटस्ऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर खोटे अकाऊंट उघडून सावजांना ठकविण्याचे प्रकार वाढले असून सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करणाऱयांची संख्याही वाढली आहे.
धारवाडमध्ये घेत होता कोचिंग
पोलिसांनी अटक केलेल्या महांतेश मुडसे या तरुणाने पीएसआय होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न खरे करण्यासाठी धारवाडमध्ये तो कोचिंग घेत होता. कोचिंग घेता घेता सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून सावजांना ठकविण्याचा उद्योग त्याने चालविला होता. अशा प्रकारे आलेल्या पैशांतून तो गोव्यात चैनी करायचा. पीएसआय होण्याआधीच फसवणूक प्रकरणांत त्याला अटक झाली आहे.
फसवणूक…
- फेसबुकवर उघडले होते तरुणीचे खोटे अकाऊंट
- सावजांना ठकविण्यासाठी खोलली तब्बल सहा बँक खाती
- सावजांकडून उकळले 19 लाख 80 हजार रुपये