प्रतिनिधी /पेडणे
हैदराबाद येथून गोव्यात परतताना पेडणे येथील अर्टिका गाडीला बिजापूर कर्नाटक येथे झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेले पेडणे येथील वर्षा विशाल बोंदे व विशाल संगराज बोंदे या दोघांचेही मृतदेह शुक्रवारी रात्री गोव्यात आणले. आज पेडणे येथे या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
या अपघातात जाखमी झालेली वर्षा हिची आई सौ. देवता दिलीप कांबळी व मयत वर्षा व विशाल यांची दहा वर्षांची मुलगी कु. हर्षिता विशाल बोंदे यांना गोव्यात आणण्यात आले असून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बांबोळी येथे उपचार सुरु आहेत. या अपघातात इतर किरकोळ जखमी झालेली व्यक्ती गोव्यात रात्री पोचणार आहेत.