ऑनलाईन टीम/तरुण भारत
ज्ञानवापी मशिद प्रकरणी (Gyanvapi Mosque Case) आज वाराणसीच्या जिल्हा सत्र न्यायालयात (Varanasi District Court) सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. या प्रकरणी आता २६ मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज वारणसीच्या जिल्हा कोर्टात आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली. या प्रकरणाची आता २६ मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, ” मुस्लिम पक्षाच्या बाजूच्आ आदेशाच्या याचिकेवर ७/११ सीपीसी अंतर्गत याचिकांवर २६ मे रोजी सुनावणी होईल.”
अधिक वाचा: पुण्यातील ‘त्या’ तरुणाला 3 जूनपर्यंत ATS कोठडी
न्यायालयानं दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. कोर्टाने दोन्ही पक्षांना सर्वेक्षणाचे व्हिडिओ आणि फोटो जमा करण्यास सांगितले आहे. या फोटो आणि व्हिडिओवर आक्षेप नोंदवण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर सुरू झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत, त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती.