अनिल बेनके चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा पतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्टस् फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात झेन स्पोर्टस् संघाने फौजी इलेव्हन व गणराज इलेव्हन संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. तर जी. जी. बॉईज एसआरएस हिंदुस्थानने एवाएएम बी संघाचा 4 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. साहिल मोमीन, मुन्ना शेख, मोहमद इम्रान, नवनीत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात फौजी इलेव्हनने 10 षटकात 7 बाद 72 धावा केल्या. दीपक नार्वेकरने 17 तर विशाल शिंदे व विशाल धनगोळे यांनी प्रत्येकी 13 धावा केल्dया. झेनतर्फे मोहमद इम्रानने 3 तर अनिकेत सनप यांनी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेन संघाने 7.3 षटकात 5 गडी बाद 73 धावा करून सामना पाच गड्यांनी जिंकला. त्यात मुन्ना शेख 17, उस्मान पटेलने 16 धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात स्टार इलेव्हन युपी संघाने 8 षटकात 9 गडी बाद 39 धावा केल्या. फिरोज शेखने 10 धावा केल्या. गणराजतर्फे नवनीत, सँडी, मुशारद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गणराजने 2.2 षटकात 44 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. निखिल नाईकने 30 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात जी. जी. बॉईज एसआरएस हिंदुस्थान संघाने 10 षटकात 4 बाद 112 धावा केल्या. त्यात नरेंद्र मांगोरेने 40, संदीप मक्वानाने 31, गणेश कोप्पळने 16 तर नंदू माळीने 13 धावा केल्या. एवायएमतर्फे संकेत, सत्यम, प्रसन्ना व अक्षय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम बी ने 10 षटकात 8 गडी बाद 108 धावा केल्या. त्यात अमित नाईकने 42, परेश ठाकुरने 24, सुमीत धनगुडेने 20 तर अक्षय पाटीलने 13 धावा केल्या. जी. जी. बॉईजतर्फे साहिलने 3, सुधीरने 2 तर विकी आणि जावेद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. चौथ्या सामन्यात गणराज जम्मू काश्मीर संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 गडी बाद 106 धावा केल्या. त्यात मयूरने 4 षटकार, 4 चौकारासह 48, अक्षय तिवारीने 17, सुमीतने 14 तर नवनीतने 13 धावा केल्या. झेनतर्फे उमर, अनिकेत, बाळासाहेब यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेन स्पोर्टस्ने 8.4 षटकात 2 गडी बाद 111 धावा करून सामना आठ गड्यांनी जिंकला. त्यात मुन्ना शेखने 3 षटकार, 3 चौकारासह 42, साईल शेखने 3 षटकार, 3 चौकारासह 40 तर उस्मान पटेलने 18 धावा केल्या. जम्मू काश्मीरतर्फे नवनीत, मश्रत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सोमवारचे सामने
1) मोहन मोरे इलेव्हन वि. एसआरएस हिंदुस्थान सकाळी 9 वाजता. 2) राहुल्स के. आर. शेट्टी वि. रामराज इलेव्हन सकाळी 11 वाजता. 3) साईराज वॉरियर्स वि. एवाएएम ए दुपारी 12.30 वाजता. 4) झेन स्पोर्टस् वि. दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ दुपारी 2.30 वाजता.