कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करा; राहुल रेखावार यांचे आवाहन
Ganpati Visarjan 2022 : आज कोल्हापूर जिल्ह्यात गौरी व गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे. मात्र पंचगंगा नदीपात्र आणि तलावात गणेश मूर्ती विसर्जनाला प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील नागरिकांनी पर्यावरण पूरक कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
भक्तिभावाने प्रतिष्ठापना केलेल्या सहा दिवसांच्या गौरी- गणपतीचे आज विसर्जन होणार आहे. यासाठी प्रशासनानेन शहरात ठिकठिकाणी कुंड उभा केले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने उभारली स्वयंचलित यंत्रणा तयार ठेवली आहे. रंकाळा जवळील इराणी खणीत स्वयंचलित यंत्रणेद्वारे मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्वयंचलित यंत्रणेचा वापर होणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक घेण्यात आलं. स्वयंचलित यंत्रणेमुळे गणेश विसर्जनावेळी होणारे अपघात टळणार आहेत.