सुमारे अडीच लाखाचे 40 ग्रॅम सोने जप्त अटक केलेले सर्वजण नातलग आहेत : दोन दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी /पणजी
येथील महालक्ष्मी मंदीराजवळ असलेल्या अभरान सराफी दुकानात चोरी करून पसार झालेल्या चारही संशयितांना पणजी पोलिसांनी बेंग्लोर येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख ऊपये किमंतीचे 40 ग्रॅम वितळलेले सोने जप्त केले आहे. संशयितांच्या विरोधात भादंसं 380 कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये शमा रमेश भाईसादे (60 पुणे), हीची मुलगी शितल परामार, जावई धनराज परामार, व धनराज याची नातेवाई विद्या प्रकाश साळूंके (56) यांचा समावेश आहे. सर्व संशयित एकमेकांचे नातेवाई असून सराफी तुकानात जाऊन हात साफ करणे हाच त्यांच्या धंदा आहे. महाराष्ट्रतील पुणे, रत्नागीरी, वाशी, कणकवली, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी, सातारा अशा दहा ठिकामी त्यांनी आत्तापर्यंत सरफी दुकानात हात साफ करून लखो ऊपये किंमतीचे सोने लुटले आहे. चोरी केलेले सोन्याचे दागिने पुणे येथे नेऊन वितळले जाते व नंतर ते विकतात असे तपासात उघड झाले आहे.
पणजीतील अभरान सराफी दुकानात चोरी झाल्याची तक्रार प्रदिप भट यांनी 12 डिसेंबर रोजी पणजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञत संशdियातांविरोधात गुन्हानोंद करून तपास कामाला सुऊवात केली होती. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे संशdियातांची ओळख मिळाली होती. त्यांच्या बाबत चोकशी केली असता त्यांचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. त्याद्वारे पोलीस गेल्या काही दिवसांपासून संशयितांच्या पाळतीवर होते. संशयितांचे मोबाईल लोकेशन बेंग्लोर येथे मिळत असल्याने पणीज पोलीस स्थानकाचे निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयुर पणशीकर, हवालदार नितीन गावकर, कॉन्स्टेबस सयेश उस्कईकर आदीत्य म्हार्दोळकर, आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल नुतन गावस यांनी बेंग्लोर गाठले. संशयित एमएच-16-एजे-0562 क्रमांकाच्या गाडीने जात असताना त्यांना यशवंतपूर बेंग्लोर येथे पणजी पोलिसांनी गाठले आणि ताब्यात घेतले.
अभरान सराफी दुकानातील सीसीटीव्हीमध्ये दिसत असणारे संशdियात तेच असल्याची खात्र पटल्यावर संशdियातांना पणजीत आणून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. संशdियातांची सखोल उलट तपासणी केली असता त्यांनी अभरान दुकानात चोरी केल्याचे मान्य केले. एक मंगलसूत्र आणि एक सोनसाखळी त्यांनी चोरी केली होती. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.