7 युवकांकडून क्रौर्याची परिसीमा
वृत्तसंस्था/ रीवा
मध्यप्रदेशच्या रीवा जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 25 दिवस जुन्या या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकण्री 7 पैकी 5 आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.
14 अन् 16 वर्षीय दोन मुली पिपराही जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे आरोपींनी प्रथम त्यांच्याशी छेडछाड केली आणि विरोध केल्यावर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेची वाच्यता केल्यास जीव घेऊ अशी धमकी दिल्याने दोन्ही मुलींनी 25 दिवसापर्यंत यासंबंधी कुणालाच सांगितले नव्हते.
परंतु या दुष्कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी याची दखल घेत दोन्ही पीडितांसह त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी त्यांच्याकडून घटनेची माहिती मिळवत आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविला. या दोन्ही मुलींवर 7 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता.