भाऊ अनमोल कॅनडातून केनियात फरार
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील सूत्रधार सचिन थापनला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली आहे. तर गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल कॅनडातून केनियात फरार झाला आहे. हे दोघेही मूसेवाला याच्या हत्येपूर्वी बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पसार झाले होते. पंजाब पोलिसांनी विदेश मंत्रालयासोबत मिळून सचिनला भारताला आणण्याची कारवाई सुरू केली आहे. तर विदेश मंत्रालयाने पंजाब पोलिसांकडून या आरोपींच्या गुन्ह्य़ांचा तपशील मागविला आहे.
सचिनला बनावट पासपोर्टप्रकरणी पकडण्यात आले असून याची माहिती विदेश मंत्रालयाला देण्यात आली. आरोपी सचिनला लवकरच अझरबैजानमधून भारतात आणले जाऊ शकते. अनमोल अन् सचिन हे आरोपी नेपाळमार्गे अझरबैजानमध्ये पोहोचले होते. त्यानंतर अनमोल हा कॅनडात पोहोचला परंतु सचिनला बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली. लॉरेन्स अन् गोल्डी बराड यांच्यासोबत सचिन थापन अन् अनमोल देखील मूसेवाला हत्याप्रकरणी आरोपी आहे.