प्रतिनिधी /बेळगाव
एलआयसी ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनतर्फे 4 थी सर्वसाधारण सभा नुकतीच बेळगाव येथे झाली. बेळगाव विभागाचे अध्यक्ष चिंगप्पा हादीमनी अध्यक्षस्थानी होते. जी. मद्दुलट, सरचिटणीस अजय कुमार, उपाध्यक्ष नागराज आचारी व्यासपीठावर होते.
आमदार सतिश जारकीहोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर सीनीयर डिव्हिजनल मॅनेजर अजित वारकरी, मॅनेजर (पी. ऍण्ड आय. आर.) गायत्री उपस्थित होते.
मागासवर्गीयांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. आणि आगामी वर्षात आणखी योजना राबविण्यात येतील, असे आश्वासन सतीश जारकीहोळी यांनी दिले. स्वतःचे, संस्थेचे आणि समाजाचे उत्थान हे आपले ध्येय असले पाहिजे, असे मत अजित वारकर यांनी व्यक्त केले.
ओबीसींचे संविधानिक हक्काचे आणि फायद्याचे परिणामकारकरित्या अंमलबजावणी केली जाईल, असे गायत्री यांनी सांगितले. विजयकुमार गंगापूत्र यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दक्षिण मध्य क्षेत्राखाली येणाऱया कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव जिल्हय़ातील अनेक कामगार संघटना आणि सामाजिक संघटनांनी सभेला हजेरी लावली.