वृत्तसंस्था/ चेन्नई
आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी चेन्नईन एफसी संघाने जर्मनीच्या थॉमस ब्रॅडरिक यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. चेन्नईन एफसी आणि ब्रॅडरिक यांच्यात नुकताच हा नवा करार झाला आहे.
जर्मनीचे ब्रॅडरिक हे यापूर्वी केएफ व्हॅलेझेनिया फुटबॉल क्लबचे प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॅलेझेनियाने 2020-21 आणि 2021-22 साली अल्बेनियन फुटबॉल चषक स्पर्धा जिंकली होती. जर्मनीतील विविध लीग फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया विविध फुटबॉल क्लबना 47 वर्षीय ब्रॅडरिक यांचे मार्गदर्शन लाभले.