बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशमूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. दक्षिण व उत्तर अशा दोन विभागात या स्पर्धा झाल्या. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे…
दक्षिण विभाग श्रीमूर्ती स्पर्धा- 1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बसवाण गल्ली, शहापूर, 2) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंगाई मंदिर, वडगाव, 3) श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शुक्रवारपेठ, टिळकवाडी
दक्षिण विभाग देखावा- 1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, समर्थनगर, 5 वा क्रॉस, 2) न्यू गुडशेड रोड, एसपीएम रोड, 3) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राणा प्रताप युवक मंडळ, हिंदूनगर, टिळकवाडी.
उत्तर विभाग श्रीमूर्ती स्पर्धा- 1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुलकर्णी गल्ली, बेळगाव, 2) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भारतरत्न पं. मदनमोहन मालवीय चौक, शनिवारखूट, 3) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पाटीलमळा, बेळगाव.
उत्तर विभाग देखावा-1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सुभाष गल्ली, गांधीनगर, दुसरा क्रॉस, 2) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माळी गल्ली, बेळगाव, 3) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बसव कॉलनी, बॉक्साईट रोड. परीक्षक म्हणून सागर देसाई व सुमित खन्नुकर, जी. डी. आर्ट्स यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
उद्या बक्षीस वितरण
काल ठरल्याप्रमाणे श्री गणेशमूर्ती व देखाव्यांचे परीक्षण करण्यात आले. शुभारंभप्रसंगी श्री गणेश उत्सव मंडळ न्यू गुड्सशेड रोड, एसपीएम रोड येथील मंडपात परीक्षक सागर देसाई व सुमित खन्नुकर यांच्या समवेत जायंट्स सदस्य उपस्थित होते. गणेशमूर्ती व देखाव्यांचे बक्षीस वितरण बुधवार दि. 27 रोजी दुपारी 4 वाजता जायंट्स भवन, कपिलेश्वर रोड येथे करण्यात येणार आहे.