प्रतिनिधी /बेळगाव
मलबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सला सर्वाधिक रोजगार आणि ग्लोबल रिटेलर ऑफ द इयर या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जेम्स ऍण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौंन्सिल यांच्यावतीने आयोजित केलेल्या 48 व्या जेम्स ऍण्ड ज्वेलरी ऍवॉर्ड कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मलबार गोल्ड ऍण्ड डायमंड ही जगातील सर्वात मोठी सुवर्ण अलंकारांची कंपनी आहे. देशासह परदेशातही मलबार ग्रुपने आपला व्यवसाय वाढविला आहे.