शासकीय सेवेत प्रामाणिक निष्ठेने काम करणारी मंडळी दुर्मिळच असतात. त्यात आरोग्य विभागात तर निष्ठेने आणि रुग्णाशी एकनिष्ठ होऊन वैद्यकीय सेवा अविरतपणे देणारा माणसातला देव माणूस मिळणेही कठीण पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागात असा माणसातला देव माणूस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर. यांनी तब्बल 19 वर्ष या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून सेवा दिली. अशा या प्रामाणिक सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सेवेतून मुक्त होऊ नये अशी विनंती वजा मागणी जनतेतून येणे हीच खरी त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल. त्यांना अजून रुग्णालयात सेवेसाठी शासनाने ठेवावे अशी मागणी त्यांच्याबाबत होत आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल पंचवीस ते तीस वर्ष सेवा केली. अशा या माणसातल्या देव माणसाला उपजिल्हा रुग्णालयातील नर्स ,कर्मचारी, डॉक्टर, यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना मानवंदना दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा असा सन्मान केला. ते काल 31 मे रोजी आरोग्य सेवेतून मुक्त झाले. त्यांना आरोग्य विभागाकडून जनतेच्या मागणीनुसार पुन्हा एक वर्ष वाढीव मुदत सेवा देण्यासाठी मिळेल ही आशा जनतेत आहेच. परंतु शासकीय प्रणालीनुसार काल बुधवारी 31 मे रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयच्या स्टाफच्या वतीने त्यांचा सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा गौरव सन्मान सोहळा म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली ती अनोखी अशीच होती.
कुणाही व्यक्तीचा असा पुष्पवृष्टी करून त्यांना सेवेतून मुक्त करताना असा सन्मान होणे हे दुर्मिळच! या सोहळ्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागरगोजे , अतिरिक्त जिल्हा शल्य शिक्षक डॉ. श्रीपाद पाटील , निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी व सावंतवाडीचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ पांडुरंग वझराटकर ,डॉक्टर सागर जाधव ,डॉ जयेंद्र परुळेकर ,डॉ शंतून तेंडुलकर, डॉ राजेश नवांगुळ, डॉ धीरज सावंत ,डॉक्टर नेत्रा सावंत, डॉक्टर मिलिंद खानोलकर, डॉ कश्यप देशपांडे, डॉ श्रेयस मांगलेकर डॉ रेवण खटावकर, डॉ भक्ती सावंत, डॉ गिरीश चौगुले, डॉ दीपक लादे ,डॉ निखिल अवधूत, डॉ समीर धाकोरकर डॉ आकाश एडके, डॉ मिलिंद अटके शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,राजू मसुरकर ,सुधन्वा आरेकर, वैद्यकीय अधीक्षक श्रीम मिसाळ, परिचारिका श्रीम येळेकर, सौ राणे ,सौ गोसावी ,सौ बिले ,सौ वंदना पास्ते आदी उपस्थित होते .