गोकुळ शिरगाव,सांगरूळ वार्ताहर
Kolhapur News : मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून मंगळवारी कोल्हापुरात दगडफेक झाली. संतप्त जमावाने शहरातील काही प्रार्थना स्थळावर आणि हात गाड्यांवर दगडफेक करत नासधूस केली,याचे पडसाद आज ग्रामीण भागात सकाळपासूनच उमटायला चालू झाले. आज सकाळी गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी संपूर्ण फाटा बंद ठेवून निषेध व्यक्त केला,यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद केली.
यावेळी शिवसेना ठाकरे गट करवीर तालुकाप्रमुख विनोद खोत उपतालुका प्रमुख शांताराम पाटील,अर्जुन इंगळे, रवींद्र जाधव,भारत खोत, जावेद मकानदार,अश्रफ पकाली,महेश शिंदे, निहाल पिंजारी, प्रमोद धनवडे,विजय सुतारइतर उपस्थित होते.
सांगरूळ येथे सकाळ पासून शांततेत बंद
सांगरूळ येथेही ग्रामस्थांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केला, ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे,उत्तम खाडे संभाजी नाळे,यांच्या सह शेकडो युवकांनी गावामध्ये फेरी मारून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले .दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद करत बंदला प्रतिसाद दिला.ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे,उत्तम खाडे संभाजी नाळे,यांच्या सह शेकडो युवकांनी गावामध्ये फेरी मारून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले .दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद करत बंदला प्रतिसाद दिला