एम.ए.मराठी साहित्यात आली प्रथम
वार्ताहर कुडाळ
संत राऊळ महाराज महाविद्यालयाची मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी सिद्धी राजन परब हिणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए.मराठी साहित्यात प्रथम येत सुवर्णपदक पटकाविले.तसेच अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी सेट परीक्षाही ती नुकतीच उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाची ती माजी विद्यार्थीनी आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.झोडगे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.शरयू आसोलकर , प्रा. संतोष वालावलकर, क.म.शि.प्र. मंडळाचे सर्व पदाधिकारी शिक्षक यांनी अभिनंदन केले. सिद्धी परब ही काळसे येथील माजी शिक्षक राजन परब यांची मुलगी आहे.