क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
तामिळनाडू येथे वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्ंिटग स्पर्धेत बेळगावच्या हलगा गावची कन्या अक्षता कामतीने 85 किलो वजनी गटात 121 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे.
या स्पर्धेत अक्षताने एकूण 206 किलो वजन उचलले. शेवटच्या प्रयत्नात अक्षताने क्लिन अँड जर्कमध्ये 121 किलो तर स्नॅचमध्ये 85 किलो असे एकूण 206 किलो वजन उचलून सुवर्णपदकाची मानकरी ठरली. यापूर्वीही अक्षताने आठ वेळा सुवर्णपदक पटकाविले आहे. तिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली असून तिने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याची हॅटट्रिक साधली आहे. तिला वेटलिफ्ंिटग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.