वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयने भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ‘गोल्डन तिकीट’ लोकप्रिय सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केले. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या महान कलाकाराकडे सदर गोल्डन तिकीट बीसीसीया सचिव जय शहा यांनी प्रदान केले. क्रिकेटप्रेमी असलेले अमिताभ बच्चन नेहमी भारतीय संघाला पाठिंबा देत असतात.a