सभापती / धीरज सूर्यवंशी
कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाला राज्य शासनाकडून अखेर मंजुरी दिली आहे. २५३ कोटींच्या या प्रकल्पाला राज्य सरकारची मान्यता मिळाली असल्याची माहिती स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांची पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दोन वर्षापासून कुपवाड ड्रेनेज योजनेच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
या रखडलेल्या प्रकल्पाची शिंदे- फडणवीस सरकारने तातडीने निर्णय घेऊन मंजुरी दिली असल्याचे त्यांनी म्हटले. या योजनेसाठी महापालिका ७६ कोटी व राज्य सरकार ९२ कोटी तर केंद्र सरकार ८४ कोटी देणार आहे.