दुसऱ्या विशेष पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी
बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. सरकारच्या आदेशानुसार कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्य निर्णय मंडळाने २०२३ साली दुसरे विशेष पुरवणी परीक्षेला बसण्यासाठी संधी उपलब्द करून दिली आहे. २१ ऑगस्ट ते ०२ सेप्टेंबर २०२३च्या दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहेत. यासाठी १० ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी नाव नोंदणी करू शकता. परीक्षेचे वेळापत्र देखील जाहीर झाले आहे.