मुंबई
कॉनकॉर्ड बायोटेकच्या आयपीओला मंगळवारी शेवटच्या दिवशी 24.86 पट सबक्रिप्शन मिळाले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार 1550 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये 1,46,50957 समभागांचे सादरीकरण करण्यात आले होते. सदरच्या आयपीओला संस्थात्मक खरेदीदारांचे 67 टक्के सबक्रिप्शन प्राप्त झाले होते. कंपनीने आयपीओ बँडची 705-741 रुपये प्रति समभाग इतकी किंमत निश्चित केली आहे. सदरची कंपनी मूळची अहमदाबादची आहे. अँकर गुंतवणूकदारांनी आयपीओ अंतर्गत 465 कोटी रुपये जमवले असल्याचे सांगितले जात आहे.